प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कारवाईचे आदेश !

0

जळगाव-जिल्ह्यामधील आदिवासी समाजाच्या तीन महिलांवर अमानुषपणे लाथाबुक्यांनी वेगवेगळ्या कारणांनी मारहाण केली होती या  संदर्भात महिलांनी संबंधिता विरोधात पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल केले असता तरी त्या विरोधात कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसता याबाबत  आदिवासी एकता परिषदेच्या वतीने १७फेब्रुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.

आशाबाई रवींद्र भिल रा वरसाडे ता पाचोरा,हि महिला गावाची सरपंच असून ४जानेवारी  रोजी त्यांना गावातील विकास होत नाही म्हणून त्यांच्याशी अश्लील भाषेच्या वापर करून त्याचा अपमान केला होता, तसेच बेबाबाई नाना सोनवणे या महीलेच्या  घरासमोर जितू तुकाराम बाविस्कर याने लघुशंका केली होती त्याला समजावण्याच्या प्रयत्न केला येथे लघुशंका का केली  मात्र याचा राग येऊन रमेश तुकाराम बाविस्कर यांनी या महिलेला  लाथाबुक्यांनी मारहाण करीत महिलेचा  हात फ्रॅक्चर केला व भुराबाई कैलास बोरसे (वय३२)या महिलेच्या घरात दारूबंदी करण्याच्या हेतूने सुका बिसन वाघ,लताबाई सुका वाघ, मंगलाबाई बापू ठाकरे,महेंद्र सुका वाघ, भगवान सुका वाघ,सुरेश सुका सोनवणे,प्रशांत ताराचंद माळी,मंगलाबाई भगवान वाघ,अनुसयाबाई ताराचंद माळी,दसूबाई लक्ष्मण वाघ, हिराबाई धनराज पवार,यमुनाबाई निरावर मालचे,जनाबाई शंकर पवार,यांनी घरात घुसून मारहाण करीत घरातील संसारोपयोगी सामानाची तोडफोड करून २४७५रुपये काढून घेतले, अप्पर  जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची दखल घेऊन या प्राणघातक हल्ला  करणाऱ्यांवर पाचोरा पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन(जळगाव)याना  आदिवासी अट्रोसिटी ऍक्ट १९८९च्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश देन्यात आले, व बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले,यावेळी आदिवासी  एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड चंद्रकांत बोरसे रत्नाबाई बोरसे कस्तुराबाई बोरसे शोभाबाई बोरसे सुभाष नाईक  राहुल सोनवणे अजय बोरसे सुनील गायकवाड करण सोनवणे आंदोलनात सहभागी होते.हि माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असे     

Leave A Reply

Your email address will not be published.