जिल्हा परिषद दादानगर शाळेची क्षेत्रभेट

0

बोदवड | प्रतिनिधी

तालुक्यातील दादानगर (नाडगाव) जि.प.शाळेची क्षेत्रभेट नुकतीच संपन्न झाली.या आयोजित क्षेत्रभेटीत तालुक्यातील नाडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाडगाव तलाव परिसर व केंद्रशाळा नाडगाव येथील नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा यांना भेटी देण्यात आल्या.
सर्वप्रथम विद्यार्थांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नेण्यात आले.यावेळी तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके करुन दाखवली.विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू हाताळल्या व प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्नेह भोजन आटोपून त्यांनी कलाविष्कार सादर केले.
त्यानंतर परिसरातील तलावाला भेट देण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना पाणीपुरवठ्या बाबतीत व पाण्याचे महत्त्व या विषयी माहिती देण्यात आली.तसेच नाडगाव येथील
केंद्रशाळेतील नाडगाव नाविन्यपूर्ण प्रयोगशाळांमध्ये भेट देण्यात आली.यावेळी येथील शिक्षक प्रदीप पाटील सर व चंद्रकांत बडगुजर यांनी प्रयोगशाळा साहित्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती साठे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रायोगिक वस्तू हाताळायला दिल्या व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थी अगदी आनंदाने शाळेकडे परतली.त्यांच्या चेहऱ्यावरून क्षेत्रभेटीचा आनंद वाहताना दिसत होता.
या क्षेत्रभेट यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश मुरलीधर घाटे सर व उपशिक्षक कैलास प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.