प्रशासनास पडला महामानवाचा विसर !

0

एरंडोल : येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर पालिका प्रशासनातर्फे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्याला स्वच्छता केली नसल्याने आंबेडकरी जनता तथा शहरातील अन्य समाजाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंबेडकरी समाज तथा अन्य समाजातील नेते अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एकत्र येतात.परंतु आज सकाळी पुतळ्या जवळ घाण साचलेली असल्याने व पुतळ्यावर धुळ जमली असल्याने सगळे संतप्त झाले. यावेळी पुतळा भागात राहणाऱ्या समाजाच्या युवकांनी  एरंडोल नगर पालिकेस पूर्व संध्याला स्वच्छता करण्यासाठी दूरध्वनी द्वारे कळवले होते.परंतु आज सकाळी ११ वाजेपर्यंत एरंडोल नगर पालिका प्रशासनातर्फे कुठलीही स्वच्छता करण्यात आली नसल्याने उपस्थित युवकांनी,आंबेडकरी समाज व शहरातील नेत्यांनी तीव्र नाराजी प्रकट केली.यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी निषेध व्यक्त करुन प्रशासनाने एक प्रकारे महान पुरुषांचा अपमान केल्याचे व तालुक्यातील अनेक अधिकारी कुठल्याही जयंती, पुण्यस्मरण तथा सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याची ही खंत व्यक्त केली.यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,डॉ.अतुल सोनवणे,ईश्वर बिऱ्हाडे व पंचशील मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी निषेध व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.