धनाजी नाना महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर वैचारिक अभिवादन परीक्षा यशस्वीपणे संपन्न

0

फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीच्या अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई) नागपुर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन स्पर्धा घेण्यात आली. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करावी आणि त्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर लिखित साहित्याचा परिचय व्हावा यासोबत स्वयंविकास आणि समाज विकासासाठी उद्युक्त करावे या विशाल हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

या परीक्षेला महाविद्यालयातून 142 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. परीक्षेला सुरुवात करण्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथी माननीय श्री तायडे व श्री मेढे यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी या स्पर्धा परीक्षेचे महाविद्यालयातील समन्वयक प्रा एस व्ही जाधव, प्रा डॉ कल्पना पाटील, प्रा शिवाजी मगर, प्रा डॉ योगेश तायडे, प्रा डॉ ताराचंद सावसाकडे, प्रा सीमा बारी, प्रा राजू पटेल, प्रा नरेंद्र वाघोदे, युवराज गाढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी केले. या परीक्षेचे स्वरूप  वस्तुनिष्ठ  आणि निबंध लेखनाच्या स्वरूपातील असून  प्रथम पारितोषिक  रुपये एक लाख  यासोबत द्वितीय पारितोषिक  रुपये 50000 असून  तरुण पिढीला  बाबासाहेबांच्या साहित्याकडे  आकर्षित करून  बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व  जनमानसापर्यंत पोहोचविणे हेच उद्दिष्ट  असल्याचे  बाणाई नागपूर यांच्याकडून कळविण्यात आले.  यावेळी विद्यार्थ्यांमधून परीक्षेसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. विद्यार्थ्यांच्या मते, बाबासाहेबांच्या पुस्तकांचा अभ्यास करण्याची संधी लाभणे हेच या परीक्षेचा सर्वोत्तम फायदा आहे, यापुढेही अशा प्रकारची परीक्षा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात यावी असा सूर विद्यार्थ्यांमधून उमटला.

Leave A Reply

Your email address will not be published.