प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे विशेष गाड्यांचे रद्दीकरण

0

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेनेहबीबगंज -पुणे हमसफ़र  विशेष गाडीसह पुढील  गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अ)   02152 हबीबगंज -पुणे हमसफ़र  विशेष दि. 01.05.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत आणि

02151 पुणे -हबीबगंज हमसफ़र विशेष दि. 02.05.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द राहतील.

तसेच  खडावली आणि अटगांव दरम्यान दोन सबवे साठी  आरएच गर्डर्स लाँचिंग साठी  एकीकृत नाइट ट्रैफ़िक आणि  पावर ब्लॉक असल्यामुळे जबलपुर -कोयंबतूर  विशेष रद्द राहिल. 02198 जबलपुर -कोयंबतूर  विशेष दिनांक 01.05 .2021 रोजी सुटणारी रद्द आणि 02197 कोयंबतूर -जबलपुर विशेष दिनांक 03.05.2021 रोजी सुटणारी रद्द.

Leave A Reply

Your email address will not be published.