पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून प्रोत्साहनपर वाढीव वेतन दिले पाहिजे

0

जळगाव – राज्यातील कोरोना आपत्ति निवारण्याच्या उपाय योजने करिता राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील होणाऱ्या वेतनातील एक किंवा दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देणगी म्हणून देण्या बाबत शासनाने परिपत्रक काढून विनंती वजा आदेश दिले आहे परंतु पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे या दरम्यान केलेले कार्य पाहता त्यांचे वेतन कमी न करता प्रोत्साहन म्हणून विशेष वाढिव वेतन दिले पाहिजे अशी मागणी आपले मानवाधिकार फाउंडेशन चे भुसावळ तालुकाध्यक्ष मयुर राजेंद्र अंजाळेकर यांनी केली आहे.

राज्यातील सर्व भा.प्र. से., भा.पो.से., भा.व.से. व महाराष्ट्र राज्य शासकीय निम्नशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे मे 2021च्या वेतनातील एक किंवा दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधि मधे देणगी म्हणून देण्याबाबात शासनाने काढलेल्या आदेशाचे आपले मानवाधिकार फाउंडेशन चे भुसावळ तालुकाध्यक्ष मयुर राजेंद्र अंजाळेकर यांनी स्वागत केले, परंतु या शासन निर्णयमधून पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वगळण्यात यावे, अशी मागणी अंजाळेकर यांनी एका पत्रकान्वये केली आहे तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

पोलिस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून मेहनत घेतली आहे. आणि घेत आहे. कार्य करण्याचा पाच दिवसांचा आठवडा असून सुद्धा सम्पूर्ण आठवडा पोलीस आणि आरोग्य कर्मचारी काम करत आहे आहे. पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने कोविड योद्धा म्हणून घोषित केले आहेच म्हणून या सर्वाना विशेष वाढिव वेतन दिले पाहिजे. असेही मा.मुख्यमंत्री साहेब यांना पाठवलेल्या पात्रात अंजाळेकर यांनी म्हटले आहे.

आपले मानवाधिकार संस्था संचालक कु. दीपेश पष्टे, श्री .वैभव हरड़, सहसंचालक , श्री.मनोहर भोईर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आपले मानवाधिकार संस्था तसेच नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शना खाली संस्था कार्यरत आहे.

आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती पूर्वक सकारात्मक विचार करून दिनांक 7 मे 2021 च्या संदर्भ शासन निर्णय मधील पोलिस तथा आरोग्य कर्मचारी व चतुर्थ श्रेणी मधील कर्मचारी यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये. अशी मागणी आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या वतीने भुसावळ तालुकाअध्यक्ष मयुर अंजाळेकर यांनी केली आहे. तसेच ह्या पुढे सुद्धा आपले मानवाधिकार फाउंडेशन पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सेवेशी ऊभी राहिल असेही त्यांनी अश्वस्त केले

Leave A Reply

Your email address will not be published.