शेंदुर्णीत आमरस पुरीने शिवभोजनचा शुभारंभ

0

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी: शेंदुर्णी शिवसेना शाखेच्या वतीने आज वाचनालय चौकात  शिवभोजन मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना शिवभोजन चा शुभारंभ आज झाला .गरजू व गरीब आन करता जेवणाची व्यवस्था व्हावी या साठी शासनाने सदर योजना सुरू केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सिने गायक पी. गणेश होते.  शिवभोजन वाटपाचा शुभारंभ  शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील,  डॉ सागर गरुड विघ्नहर्ता रुग्णालय पाचोरा, युवा सेना जिल्हा अधिकारी अँड. भरत पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

आज शुभारंभाच्या दिवशी आम रस पुरीच्या 50 थाळ्यांचे  वितरण करण्यात आले.  यावेळी बोलताना गरुड यांनी सांगितले की शिवभोजन योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. सदर योजने करिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अन्न वाटपा सारखे पुण्य नाही. कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे व योजना सफल करावी.

या वेळी कोरोना योद्धा विजय निकम व संजय कोळी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन सुनील गुजर व अजय भोई यांनी केले. प्रास्ताविक उप तालुका प्रमुख डॉ सुनील अग्रवाल यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी यांच्या सोबत भूषण बडगुजर, अशोक बारी,सुदर्शन पाटील,बारकु जाधव सोनू नेर पगारे, धनंजय गरुड, रोहित पवार विचार मंचचे अध्यक्ष रवींद्र गुजर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.