रुग्णालयात महिलेच्या पर्समधून १५ हजाराची रोकड लांबविली

0

जळगाव : जळगावातील रुग्णालयात महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १५ हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील रहिवासी अलका लोणे हया पती मधूकर लोणे व मुलगी युवती पाटील यांच्यासह वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी पती मधूकर लोणे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ जळगावातील शाहूनगरामधील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर ११ मे रोजी अलका यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना देखील मुलगी युवती हिने अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तसेच मेडिकल बिलाकरीता साडे बारा हजार व जेवणाच्या डब्यासाठी अडीच हजार रूपये युवतीने हिने आईला दिले होते. ते पैसे अलका यांनी पर्समध्ये ठेवले होते. दरम्यान, गुरूवार, १२ मे रोजी पती मधूकर यांनी जेवण केले की नाही, याची विचारपूस करण्यासाठी अलका हया आयसीयू रूममध्ये गेल्या, तेवढयात त्यांच्या पर्समधील पंधरा हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरटयाने चोरून नेली. पाच ते सहा मिनिटानंतर त्या त्यांच्या जागेवर आल्या असता, त्यांना पर्समधील रोकड गायब झालेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच मुलगी युवती हिला सांगितला व डॉक्टरांना सुध्दा घटना कळविली. अखेर युवती राहुल पाटील यांनी गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्‍यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.