पैशाच्या वादावरून ममुराबाद येथील तरूणाला मारहाण

0

जळगाव । उसनवार पैशाच्या वादावरून ममुराबाद येथील तरूणाला तिघांनी मारहाण करत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, ममुराबाद येथील शरद आत्मराम पाटील (वय-३०) हा बसचालक असून त्याने शरद पाटील यांच्या पत्नीने संशयित आरोपी राहुल भिमराव पाटील आणि योगेश भिमराव पाटील यांच्याकडून ५० हजार रूपये व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान शरद पाटील यांनी ५ हजार रूपये प्रमाणे गेल्या सात महिन्यापासून पैश्याचा परतावा करत होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास फुले मार्केटसमोर शरद पाटील यांना बोलावून आरोपी राहुल भिमराव पाटील, योगेश भिमराव पाटील आणि एकजण यांनी ‘घेतलेले पैसे आजच्या आज दे’ असे सांगून तिघांनी बेदम मारहाण केली, नाहीतर आठ दिवसात टपकावून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीसात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.