जळगावात तरुणाची आत्महत्या

0

जळगाव । शहरातील सुप्रीम कॉलनीत २८ वर्षीय तरुणाने मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शेख अझर शेख हसन (वय-२८) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेख अझर शेख हसन हा पत्नी व मुलांसोबत आईवडीलांपासून वेगळा राहत  असून तो बांधकामाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, त्याने घरात एकटाच असताना मध्यरात्री दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. आज सकाळी ठेकेदार शेख अझरला कामावर घेऊन जाण्यासाठी सकाळी ९ वाजता त्याच्या घरी आला. बराच वेळ दार ठेठावले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडून बघितले असता शेख अझर गळफास घेतल्याचे लक्षात आले. एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर मृतदेह खाली उतरविण्यात आला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.