पेणमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारा !

0

पेण : ताैक्ते चक्रीवादळाचा तडाखा पेण तालुक्यालाही बसला असून मुसळधार पावसासह जोरदार वारा सुटल्याने बऱ्याच ठिकाणी विजेचे पोल व जागोजागी झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच काहींच्या घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घरांवर व गाड्यांवर झाडे पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

या वादळी वाऱ्यासह पावसामुळे काहींचे अन्नधान्य भिजून खराब झाले तर वाहनांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता ताउक्ते चक्रीवादळ या सर्व संकटांमुळे जनता हैराण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.