यावल तालुक्यात अवैद्य प्रवासी वाहतुक तात्काळ बंद न केल्यास आंदोलन ; भाजपाचा ईशारा

0

यावल (प्रतिनिधी) कोरोनाचे थैमान सुरु असतांना अनेक निरपराध नागरीकांचा यात मृत्यु होत असतांना दुसरीकडे मात्र तालुक्यात सर्वत्र अवैध धंद्याना ऊत आले असुन पोलीस प्रशासनाचे या प्रश्नाकडे हेतुपुरस्पर  दुर्लक्ष होत असुन या सर्व अवैद्य धंधांना तात्काळ बंद न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा ईशारा तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी दिला असुन आपण या संदर्भात लेखी तक्रार आपल्या वरिष्ठांपर्यंत करणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे .

या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या मुलाखातीत तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी सांगीतले की यावल शहरात व तालुक्यात सर्वत्र जुगारीचे अड्डे , अवैध दारूची व बनावट दारूची सर्रास विक्री होत असुन या खुल्लेआम विक्री होत असलेल्या दारू, बनावट दारू ,गांजा भांग आणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून जोमाने सुरू असलेली अवैद्य प्रवासी वाहतुक यात आसनव्यवस्था व प्रवासी क्षमते पेक्षा मोठ्या प्रमाणावर अधिक भाडे आकारणी करून होणारी गरजु प्रवासांची होणारी लुट व सोशल | डिस्टेंसिग होणारा फज्जा असा प्रकारे नागरीकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे तर दुसरीकडे उघड उघड मिळणाऱ्या दारूच्या व्यसनामुळे अनेक तरूणाच्या जिवनाची राखरांगोळी होत असुन, त्यांच्या कुटुंबांना आर्थीक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने प्रसंगी त्यांच्या कुटुंबावर उपासमारी सारखे प्रसंग ओढवले जात आहे . असे असतांना मात्र पोलीस प्रशासनाच्या आर्थीक मोहापोटी ही सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरू असुन , कोरोनाच्या नांवाखाली मात्र पोलीसांकडुन सर्वसामान्यांना त्रास देवुन कायद्याचा बढगा दाखविला जात आहे . असे आरोप पोलीस यंत्रणेच्या विरूद्ध भारतीय जनता पक्षाचे तालुका उमेश फेगडे यांनी सांगीतले असुन , तात्काळ तालुक्यातील ही सर्व अवैद्यधंदे बंद न झाल्यास आपण प्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करू अशा ईशारा ही त्यांनी दिला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.