पेट्रोल पंपावर चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त

0

भुसावळ | प्रतिनिधी 

शहरातील जळगांव रोडवरील एस.एफ.अमरेलीवसला पेट्रोल पंपावर दिनांक 14 मार्चला रात्री अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाने  येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.यातील आरोपी फरार असून चोरीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी वाहन दिनांक 24 मार्चला पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केले आहे.
अधिक माहिती अशी की,फिर्यादी दिलीप प्रभाकर चौधरी राहणार लोणारी मंगल कार्यालय जवळील असून हे दिनांक 14 मार्चला रात्री एस.एफ.अमरेलीवाला पेट्रोल पंपावर ड्युटी करीत असतांना 25 ते 30 वयोगटातील अज्ञात सहा तरुणांनी चारचाकी वाहनाने  येऊन पेट्रोल पंपाच्या ऑफिसचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून मॅनेजर यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून हातातील पैसे हिसकविण्याचा प्रयत्न केला होता म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुरुन 50/2020 कलम 395, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले चारचाकी वाहन क्रमांक (एम.एच.04 ई. क्यू.2314 ) हे वाल्मिक नगर मध्ये कपड्याने झाकलेले असल्याची माहिती बातमीदारा कडून गुप्त बातमी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळताच पोलीस कर्मचारी संजय पाटील,सुपडू पाटील,सुनील सैदांने (बंटी) यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता वाहनांची चाबी न मिळाल्याने गॅरेज मॅकेनिकला बोलावून वाहनांला सुरू करून शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. गुन्ह्यातील एकही आरोपी अटक करण्यात आलेले नसून आरोपी फरार आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.