पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर खडसेंची प्रतिक्रिया….. म्हणाले

0

उस्मानाबाद : भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून 2014 मध्येही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत भाजपकडून शिवसेनेकडे उत्तर मागितले जात असताना आता यावर भाजप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शिवसेनेला होते. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले. अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना खडसे म्हणाले, सरकार मिळवण्यासाठी किंवा सरकारमध्ये येण्यासाठी असे विविध प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य जबाबदार आहे. त्यामध्ये तथ्य असेल. २०१९  मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही मतभेद असल्यामुळे, टोकाचे मतभेद झाल्याने, सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं, असंही ते यावेळी म्हणाले

आज एकमेकांच्या विरोधात तत्व आणि विचार असताना भाजपविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार 2014 मध्येही झाला असावा. त्यामुळेच प्रयत्न झालेच असतील. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही कारण दोन्ही पक्ष 2014 मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते, असं खडसेंनी नमूद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.