पुनर्मूल्यांकनासाठी महाविद्यालयांऐवजी थेट विद्यापीठाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

0

जळगाव ;- पुनर्मूल्यांकनासाठी महाविद्यालयांऐवजी थेट विद्यापीठाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा या वर्षापासून सर्व विद्याशाखांच्या परीक्षांकरीता उपलब्ध करून देण्याचा निर्णय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घेतला आहे. गतवर्षी नोव्हेंबर 17 च्या परीक्षेत केवळ अभियांत्रिकी विद्याशाखेपुरती ही सुविधा उपलब्ध होती.

कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीत काही नवे अमुलाग्र बदल केले जात आहेत. सर्व परीक्षांचे निकाल 30 ते 45 दिवसांच्या आत लावले जात आहेत. नोव्हेंबर 2017 च्या अभियांत्रिकी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. व तातडीने फास्टट्रॅक पध्दतीने त्या विद्याथ्र्यांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. गतवर्षी पाच हजार विद्याथ्र्यांनी फोटोकॉपी / पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यांना तात्काळ दुसज्या दिवशी उत्तरपत्रिकेची सॉफ्टकॉपी उपलब्ध करून देण्यात आली होती.

गतवर्षी अभियांत्रिकीच्या विषयांसाठी सुरू झालेली ही सुविधा आता एप्रिल 2018 मध्ये झालेल्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षांसाठी सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या प्रक्रीयेमुळे विद्याथ्र्यांना महाविद्यालयाऐवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करता येईल. यापूर्वी महाविद्यालयाकडे अर्ज सादर करावे लागत तेथून ते एकत्रित विद्यापीठाकडे महाविद्यालयाकडून सादर केले जात असत, आता या सुविधेमुळे विद्याथ्र्यांचा वेळ वाचणार असून फोटोकॉपीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तात्काळ सॉफ्टकॉपी विद्याथ्र्यांना दिली जाणार आहे. यावर्षी बी.कॉमचा निकाल 20 मे रोजी जाहीर झाला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर फोटोकॉपीसाठी आतापर्यंत अर्ज केलेल्या 277 विद्याथ्र्यांना तात्काळ सॉॅफ्टकॉपी उपलब्ध करून देण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्यांनी अर्ज केल्यावर त्याच दिवशी फोटोकॉपी देण्यात येत आहे.
विद्यापीठाने गेल्या आठवड¶ात या संदर्भात परिपत्रकही प्रसिध्द केले असून विद्याथ्र्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर फोटोकॉपीसाठी 15 दिवसाच्या आत, केवळ पडताळणीसाठी 21 दिवसाच्या आत आणि रिड्रेसल साठी फोटोकॉपी मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. यासाठी सर्व विद्याशाखांच्या विद्याथ्र्यांनी www.nmu.ac.in या संकेतस्थळावर जावून student corner या लिंकवर उपलब्ध असलेल्या कार्यपध्दतीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे. याच लिंकवर नियमानुसार विद्याथ्र्यांनी आवश्यक ते शुल्क देखील ऑनलाईन पध्दतीने भरावेत. त्यानंतर पुढील प्रक्रीया विद्याथ्र्यांना एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी आणि संगणक केंद्र प्रमुख डॉ.विनोद पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.