पुड्या बांधणारे भगत बालाणी आता पुड्या सोडतात !

0

जळगाव (प्रतिनिधी) : 25 वर्षापूर्वी  मेहरूण येथे छोट्या किराणा दुकानात पुड्या बांधणारे भगत बालाणी आज पुड्या सोडण्याचे काम करीत आहेत. किरणा दुकानापासून व्हाया महापालिका ते थेट ‘बालाणी लॉन’ कसं झाले यांची सर्वांना माहिती आहे. 30 वर्ष कोणी शेण खाल्ला आहे याची आम्ही माहिती काढू.  तसेच यासंदर्भात एकनाथराव खडसे यांचीही भेट घेऊ. श्री.बालाणी यांनी शिवसेना नगरसेवकांच्या तोंडी लागू नये असा इशारा देत मनपात बहुमत असतांना अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर दोष कुणाचा? असा सवाल करत मनपातील शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी यांनी पत्रकार परिषदेत भाजपाला जोरदार प्रत्यूत्तर दिले. यावेळी नगरसेवक सुनील महाजन, शरद तायडे यांची उपस्थिती होती.

वॉटरग्रेस कंपनीला दिलेला सफाईचा मक्ता रद्द करण्याची मागणी आ. सुरेश भोळे यांनी विधानसभेत केल्यावर सुनील महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावर महाजन यांनी हा मक्ता महासभेत ही रद्द होऊ शकतो तर विधानसभेत प्रश्न का मांडला तसेच सफाईचा मक्ता देण्यासाठी आ. भोळे यांनी मनपात येऊन आधी बैठक घेऊन सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्याची सूचना दिली होती. आता ते मक्ता रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा दावा केला होता. त्यावर श्री.बालाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुड्याचे आरोप करू नये असे म्हणून सर्व आरोपाचे खंडन केले. त्यावर आज रविवारी शिवसेना कार्यालयावर सुनील महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, श्री.बालाणी ह्यांना सुरेशदादा यांच्या फोटो सभागृहात चालत नाही, लपून छपून ते 7, शिवाजी नगर येथे जाऊन त्यांच्याशी संपर्कात होते हे वास्तव आहे.

भगत बालाणी यांनी उतरत्या वयात नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन भगवंताचे नाव घेत  घरी बसावे. तसेच भाजपात फक्त  बालाणी हेच पत्रकार परिषद घेतात. तसेच त्यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा आम्ही सुध्दा जशास तसे उत्तर देवूू. शिवसेनेचा गटनेता असल्याने मी ही गप्प बसणार नाही असे नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगिलते. शरद तायडे यांनी भगत बालाणी यांना तो भगत नाही भोपळा असल्याचेही सांगिलते. तसेच नैतिकताच्या गोष्टी श्री.बालाणी यांनी करू नये. अगोदर त्यांनी पाणपोईचा नाव स्व. निखिलभाऊ खडसे असं ठेवले होते आणि आता नामांतर करण्यात आले आहे. सुनील महाजन यांनी आक्रमक भूमिकेत सांगितले की, शिवसेना ही कोणाचा बापाला घाबरत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.