पिंपळगाव हरेश्वर येथे गावठी दारू हातभट्टी नेस्तनाबूत

0

पिंपळगाव हरेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथून जवळ असलेल्या शिंदाड येथे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांनी गुप्त माहिती मिळाल्याच्या खबरीवरून स.पो.नि.  कृष्णा भोये, पि.एस.आय. दिगंबर थोरात यांच्यासोबत  पोलिस रणजीत पाटील, संदीप राजपूत, पंकज सोनवणे आदींच्या पथकाने गोपनीयता पाळून शिंदाड शिवारात नाल्याच्या काठावर केटी, वेअरजवळ  गावठी दारू अड्ड्यावर असलेल्या गावठी हातभट्टी चालवत असतांना धाड टाकून एकाला रंगेहात पकडले. त्याची हातभट्टी नेस्तनाबूत करण्यात आली. या धाडीत कच्चा रसायन साठा व गावठी दारू जप्त करण्यात आली.

1)9360/-रु कि. चे 15 लिटर मापाच्या 24प्लस्टिकचे कॅनमध्ये प्रत्येकी 13 लिटर प्रमाणे 312 लिटर गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायण 2) 750/- रु. कि. ची एका 20 लिटर मापाच्या प्लॅस्टीकची कॅन मध्ये 15 लिटर गाहमची तयार दारु. —-10,110/- एकूण.. वरील प्रमाणे वरील वर्णनाचा व किं.चा मुद्देमाल आरोपी  याचे कडून जप्त करून घेतला.

त्या मालातील सी.ए नमुन्याकरीता दोन काचेची 180ml बाटली घेउन त्या बाटलीत कच्चे रसायन तसेच गावठी हात भट्टीची तयार दारू भरून तिला पोस्टेचे लेबल लावुन वर पंचाचे सह्यांचे कागदी लेबल लावुन सिल बंद केली व नाल्याच्या काठाजवळ मिळुन आल्याने उर्वरीत माल पंचासमक्ष जागीच नाश केला. जप्त बाटल्या तसेच आरोपी ला ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या  विरुध्द महाराष्ट्र दारु बंदी  अधि. कायदा कलम 65 (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून पोलिसांबद्दल असलेला गैरसमज दूर होऊन आदरयुक्त वातावरण तयार झाले असल्याने गावागावातील सुज्ञ नागरिक  कृष्णा भोये यांना अवैधधंद्याची गुप्त माहिती देऊन कारवाईची मागणी करत आहेत. जनतेनेदेखील गावात किंवा परिसरामध्ये अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास संपर्क साधावा असे स.पो.नि. कृष्णा भोये यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.