पाळधी येथे कापुरे परिवारातर्फे श्री गणरायाची विशेष भक्ती

0

पाळधी. ता, धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काशी पंढरी नगर येथे राहत असलेले कापुरे परिवार यांनी अखंड तीन दिवस टाळ-मृदुंगाचा गजर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. गणपतीचे सतत नामस्मरण व्हावे आपल्यासोबत इतरांचे नामस्मरण व्हावे जो आनंद व आशीर्वाद मिळेल तो इतरांना मिळावा , या उद्देशाने कापुरे परिवाराने अखंड टाळ मृदुंग व नामस्मरण संकल्प केला.

टाळ मृदुंग व नामस्मरण रात्र व दिवस चालू असल्यामुळे तेथील लोकांना  कुतूहल वाढत होते. कापुरे परिवार यांच्या घरी येऊन  शेकडो भक्त या ठिकाणी भेट देऊन गेले.  त्यामध्ये कॉलनीतील व आसपासच्या परिसरातील भक्त येत असे व टाळ-मृदुंग व नामस्मरण करत, या ठिकाणी जे भक्त सदिच्छा भेट देत असे त्यांना कापुरे परिवारातर्फे श्रीफळ व रुमाल व स्त्रियांना ब्लाउज पीस तसेच मुलांनाही प्रसाद म्हणून कॅडबरी त्यांना भक्तिमय भेट म्हणून देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य प्रताप राव पाटील तसेच ज्येष्ठ  नागरिक तसेच महिला मंडळ व  बाल गोपाल यांनी टाळ-मृदुंग व नामस्मरणाचा खूप खूप आनंद घेतला.

 

कापुरे परिवारालाही या वातावरणाची एक आत्मिक समाधान मिळाले असून यामुळे आम्हाला आमच्या परिवाराला व परिसरातील गणेश भक्तांना खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली.  हे गणराया आम्हा सर्वांना सुख शांती देवो व आम्हाला सर्व देशाला करोना पासून मुक्ती मिळावी अशी गणरायाचे चरणी प्रार्थना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.