पाळधी येथील बालाजी भक्तांचा सत्कार

0

माजी सरपंच शरदचंद्र कासट यांचा सेवाभावी उपक्रम

पाळधी ता.धरणगाव – येथील उद्योगपती माजी सरपंच, श्रीराम येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र गेल्या 22 वर्षा पासून गरीब वृध्द स्त्री-पुरुषांना तिरुपती येथे बालाजी व महालक्ष्मी दर्शन यात्रेसाठी स्व खर्चाने किमान 100 जणांना दरवर्षी तिर्थयात्रा करुन आणतात. गोरगरीब वृध्दांना तिर्थयात्रा करुन आपणास आत्मीक समाधान लाभते व जनसेवा हीच ईश्‍वर सेवा मानत असल्याने दरवर्षी आपण हा उपक्रम राबवतो असे शरदचंद्र कासट यांनी सांगितले.
सदर तिर्थयात्रा सुखरुप पार पडल्या बद्दल भुसावळ स्टेशन वर जावून श्री शरदचंद्र कासट व संध्याताई कासट या सेवाभावी दांपत्यांचा सत्कार दिपक वाडीले, मुकेश भोई,मधुकर माळी, मेंद्रसींग पाटील, साहेबराव सोनवणे, अशोक कोळी बापु माळी व पाळधी युवा सेना कार्यकर्त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.