पालकमंत्री पांदन योजना ही फक्त फलकावर मिरवण्यासाठी आहे का? आस्टोली ग्रामस्थांचा सवाल

0

अमरावती (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील अतिक्रमण काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे हा उद्देश ठेवून चार महिन्यांपूर्वी पालकमंत्री पांदण रस्ते योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावर समिती स्थापन करावे, असे आदेश दिले. पण जिल्हा प्रशासनाकडून या आदेशाकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते .गेल्या सहा महिन्यात जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले,  आष्टोली गावात ही रस्त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण झाले पण पूर्णतः काम अपूर्ण सोडण्यात आले .

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाने योजना आखली, त्यासाठी दीड कोटीचा निधीही दिला, पण जिल्हा प्रशासनास या योजनेची दक्षता घेण्यासाठी सवडच नसल्याचे दिसते.

राज्य शासनाने पालकमंत्री पांदण, शेत रस्ते योजना फेब्रुवारी महिन्यात  जाहीर केली. आदेशात शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी व यंत्रासामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज असते . शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतामून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होतात.

पावसाळ्यात शेतीमध्ये पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रामार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पांदण रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम करण्यासाठी तीन प्रकारचे भाग करीत एका कि.मी.साठी ५० हजार रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. शेत, पांदण कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे, अतिक्रमणमुक्त कच्चा रस्ता तयार करणे व रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता तयार करणे ही तीन प्रकारची रस्ते पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून करायची आहे. हा रस्ता करताना ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची सहमती आहे व कच्चा रस्ता यापूर्वीच करण्यात आला आहे, अशा ठिकाणी पक्का रस्ता घेण्यात यावा. यासाठी जवळपास उपलब्ध असलेल्या दगड, मुरूम व मातीचा वापर करावा. विविध योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणच्या कामातून दगड, मुरूम व माती वापरून कल्पकतेने रस्ता मजबुतीकरण करावे. शेतरस्ता, पाणंद रस्ता बांधकामासाठी जे गौण खनिज वापरले जाणार आहे, त्यासाठी स्वामित्व शुल्क आकारू नये.

एका कि.मी. साठी ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरी सुद्धा  आष्टोली येथे  आष्टोली ते गणोजा  व आष्टोली ते डोमक हे पांदण रस्ते अपूर्ण ठेवून शेतकर्याचे  नुकसान करण्यात येत आहे . या संदर्भात मोहितभाऊ अढाऊ ग्रामपंचायत सदस्य तथा स्वराज्य संघटना स्वस्थापक यांनी  चौकशी केली असता .सदर ठेकेदाराचे उडवा उडवीचे उत्तर मिळाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या अपूर्ण कामाची कोणीच  दखल घेत नसून,पालकमंत्री पांदण योजना ही फक्त फलकावर मिरवण्यासाठीचआहे अशी तक्रार आष्टोली गावातील सर्व नागरिकांनी केली आहे . पालकमंत्री पादंणरस्ते योजने अंतर्गत आष्टोली ते गणोजा पादणंरस्त्याचे खडिकरण मंजूर झाले असून कामास विलंब होत आहे.आणि या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय आष्टोली चे सरपंच नंदकिशोर अ.कोरे यांनी ग्रामपंचायती तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार सुद्धा केली असून.  त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला आजपर्यंत उत्तर दिले नाही अशी तक्रार सरपंचानी  केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.