पारोळ्यात मुख्यमंत्र्यांचे जंगीत स्वागत !

0

जळगाव :- भाजपाच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान यात्रेतील दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात सकाळी धुळे येथून झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यातील पारोळा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारोळा येथे माझा स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असे मला अपेक्षित नव्हते, मात्र अपेक्षेपेक्षाही जंगी स्वागत तुम्ही केले असल्याने मी पारोळ्यातील स्वागत आयुष्यभर विसरणार नाही असे सांगितले.यावेळी जलसंपदामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.