पारोळा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी केशव क्षत्रीय तर उपाध्याक्ष पदी अशोक लालवानी

0

पारोळा प्रतिनिधी :
येथील व्यापारी महासंघाची बैठक जेष्ठ सल्लागार विलास एकनाथ वाणी, मनोहर बालचंद हिंदुजा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सपंन्न झाली. सदर बैठकीत व्यापाऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन सामाजिक कार्य करण्याबरोबरच गोर – गरिब विद्यार्थीना शैक्षणिक मदत करण्यासाठी पारोळा व्यापारी महासंघ पुढाकार घेणार आहे. यावेळी व्यापारी महासंघाची नविन कार्यकारणीची बैठकीत या वेळी घोषीत करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी केशव लक्ष्मणसा क्षत्रिय यांची तर उपाध्यक्ष पदी अशोक नारायणदास लालवानी व सचिव पदी संजय विठ्ठल कासार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. तर उमेश जीवनलाल जैन, केशव क्षत्रीय, महेश हिंदुजा, गोपाल दाणेज, अशोक लालवाणी, आकाश महाजन, रमेशकुमार जैन, भगवान दगा महाजन, संजय कासार,यांची कार्यकारणीत निवड करण्यात आली.

यानिवडी चे शहराच्या विविध स्तरावरून स्वागत होत आहे

या निवडी बद्दल आ. चिमणराव पाटील, मा, पालकमंत्री डॉ सतिश पाटील, नगराध्यक्ष करण पवार, मा,नगराध्यक्ष गोविंद शिरोळे , सुंरेद्र बोहरा, चंद्रकांत पाटील, आदर्श शिक्षक स,ध, भावसार सर, तसेच पारोळा दर्पण पत्रकार संघाच्या वतीने तसेच विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले, तसेच अशोक कुमार लालवानी हे दैनिक लोकशाही चे पारोळा प्रतिनिधी असल्याने दैनिक लोकशाही च्या वतीने ही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.