देशात कोरोनाचा कहर थांबेना : २४ तासांत ४८ हजार ६६१ नवीन रुग्ण आढळले

0

नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात मागील २४ तासांत ४८ हजार ६६१ नवीन रुग्ण आढळले आहे. २४ तासांत तब्बल ७०५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ३२ हजार ६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधित मृत्यूमध्ये भारत जगात सहाव्या स्थानावर पोहचला आहे. असे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर नीचांकी २.३८ टक्के आहे. १० लाख लोकसंख्येमागे ८६४ लोकांना करोनाची बाधा झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८ लाख ८५ हजार ५५७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख ६ हजार ८८२ जणांवर उपचार सुरु आहेत रुग्ण बरे होण्याचं देशातील प्रमाण जळपास ६४ टक्के इतके आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात २५ जुलै रोजी चार लाख ४२ हजार २६३ करोना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंतच्या एका दिवसातील या सर्वाधिक करोना चाचण्या आहेत. आतापर्यंत देशात एक कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.