वैष्णवी पाटील बारावीत परिक्षेत घवघवीत यश

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील वडगाव स्वामीचे येथील रहिवासी सध्या जळगाव येथे वास्तव्यास असलेले राजेंद्र दिपला पाटील यांची कन्या स्वामी विवेकानंद ज्युनियर काॅलेज (एम. जे. महाविद्यालय) जळगाव येथे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. तसेच गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले. जळगाव येथील आर. टी. ओ विमा एजेंट ने उपजीविकेवर मात करत आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी जिवाचे रान केले. मुलीनेही परिस्थितीशी झगडत अभ्यास करून बारीवीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवीत गणितात १०० पैकी १०० गुण मिळवुन एक आदर्श निर्माण केला आहे. राजेंद्र दिपला पाटील यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी साथ दिली. परिस्थितीशी सामना करून मुलीने देखील अभ्यास करुण यश मिळवले. वैष्णवी हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वञ कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.