पारोळा येथे व्यापारी महासंघाच्यावतीने सॅनिटाइजरए माॅस्क व हॅण्ड ग्लोजचे वाटप

0

पारोळा (प्रतिनिधी) :  येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पारोळ्यातील व्यापारी महासंघाच्या वतीने बाजारपेठत कापड दुकाने, बुट चप्पल विक्रेता, मेडीकल, हार्डवेअर तसेच इतर  दुकानात सॅनिटाइजर,  माॅस्क व भाजीपाला विक्रेता व वृत्तपत्र विक्रेते  यांच्यासाठी हॅण्ड ग्लोज तसेच प्रत्येक दुकानदारांला जास्तीचे माॅस्क देऊन येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना त्यांचे वाटप करण्यास सांगण्यात आले आहे.

नगराध्यक्ष करण पवार व येथील नगरसेवक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच पारोळा येथील नामांकित अमृत गृप (अमृत कलेक्शन) येथे नगराध्यक्ष करण पवार यांच्या हस्ते सॅनिटाइजर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी या उपक्रमाबद्दल सर्व व्यापारी महासंघाचे आभार व्यक्त केले. तसेच इतरानीही असेच उपक्रम राबविण्यात यावे असे सांगितले. तसेच या कामी काही मदत लागली तर आम्ही सर्व अर्थात मी व नगरसेवक  मिळून आपल्याला मद्दत करू असे आश्वासन दिले.

या प्रसंगी  नगराध्यक्ष करण पवार, आरोग्य सभापती दिपक अनुष्ठान, प्रकाश महाजन,पि,जी,पाटील,भैय्या चौधरी, प्रकाश वाणी, कैलास पाटील, नितिन सोनार, धिरज महाजन, गौरव बडगुजर, अमोल चौधरी, सलिम पटवे,नगरपालिकेचे कर्मचारी, पत्रकार तसेच व्यापारी महासंघाचे केशव क्षत्रिय, विलास वाणी, संजय कासार, अशोक कुमार  लालवानी, सुनिल भालेराव, मोहन क्षत्रिय, यांच्या सह शहरातील नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्ष यांच्या आवाहन ला व्यापार्यांची साथ

आज सोमवार असुन बाजार पेठ उघडण्याचा पहिला दिवस होता तरीही पारोळा येथील व्यापार्यांनी आपली एकता दाखवत व नगराध्यक्ष यांना दिलेल्या शब्दाचा मान राखुन बाजार पेठ बरोबर तीन वाजेच्या आत बंद करून व्यापार्यांनी नगराध्यक्ष च्या आवाहनाला साथ दिली, त्यामुळे पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सर्व व्यापार्यांचे आभार मानले या पुढेही अशीच एकता व साथ राहु द्यावी अशी आशा व्यक्त केली,

Leave A Reply

Your email address will not be published.