पारोळा येथे वादळ वार्यासह अवकाळी पाऊस

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरात दुपारी साडेतीन च्या सुमारास अचानक सोसाट्यच्या वार्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात झाली,या बरोबरच नेहमी प्रमाणे विज गुल झाली, मागील अनेक दिवसा पासुन असाह्या असा उकाळ्या मुळे नागरिक हैरान झाले असतांना आज शनिवारी दुपारी अचानक सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाला देखील सुरूवात झाल्याने असाह्य उकाळ्या पासुन थोडाफार का होईना दिलासा मिळाला या अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबड उडाली तर नेहमी प्रमाणे वार्याला सुरुवात होताच लाईट गुल झाली बाहेर पाऊस तर घरा मध्ये उकाडा असल्याने नागरिक हैरान झाले,या वादळ वार्याचा जास्त फटका हा तालुक्यातील महाळपुर बहादरपुर सह इतर गांवाना बसला या वादळ वार्या मुळे या भागातील अनेक वृक्ष उनमळुन पडेले असल्या ची माहीती समोर येत आहे, तर अार्ध्या तासाच्या पाऊस वार्या नंतर उकाड्या ने नागरिक हैरान झाले.

तर अधुन मधुन विजांसह गडगडाट ही होत होता तर दुसरी कडे वार्या चा वेग ही मंदावला होता,अरबी समुद्रात उठलेल्या वादळा चा हा परिणाम असल्याचे काही जाणकार मंडळी सांगत होते,

Leave A Reply

Your email address will not be published.