पारोळा येथे पोलासांची कडक कारवाई ला सुरुवात

0

पारोळा (प्रतिनिधी) : काही केल्या कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत न असल्याने प्रशासनाने पारोळा येथे आज पासुन कडक अमल बजावणी ला सुरुवात करुन विनाकारण फिरणार्या वर कारवाई चा बडगा उगारत अनेक जणावर कारवाई केली स्वता पोलिस निरिक्षक संतोष भंडारे हे आपल्या पथकासह भर दुपारी रस्तावर उतरुन कारवाई करताना दिसत होते,तसेच पो,नि यांनी आज पारोळा तालुका वासियांना आवाहन केले कि कोणी विना कारण रस्तावर फिरु नये तसेच जो कोणी सबळ कारणा शिवाय फिरताना आढल्यास त्या वर कडक कारवाई करण्यात येईल म्हणुन कोणी ही विना कारण फिरु नये व प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी त्यांच्या सोबत पारोळा पोलिस स्टेशन चे कर्मचारी तसेच नगर पालिके चे कर्मचारी ही सोबत होते.

माझी सर्व पारोळा वासीयांना विनंती आहे की lockdown चे पालन करा विनाकारण रोडवर फिरून स्वतः किंवा आपल्या कुटुंबाला कोरोना positive करू नका केसेस झाल्या तर विनाकारण सरकारी नोकरीच्या वेळी प्रॉब्लेम येतो आपल्या तालुक्यात कोरोना नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल त्यामुळे विनाकारण रोडवरील गर्दी टाळावी सगळे मिळून पारोळा कोरोना मुक्त करूया उल्लंघन केल्यावर कारवाई होईलच त्यापेक्षा आपणच समजूतदार पणा दाखवून प्रशासनाला सहकार्य करावे घरीच थांबा मास्क वापरा ज्या दुकानांना शासनाने परवानगी दिली ११ वाजे पर्यंत चालू ठेवण्याची त्या व्यापारी बांधवांना विनंती की त्यांनीही कृपया ११ च्या पुढे दुकाने उघडी करू नयेत दुकाने सील ची कारवाई आता प्राशसन स्तरावर मोठ्या प्रमाणात वेगाने होणार आहे,

संतोष नारायण भंडारे पोलीस निरीक्षक
पारोळा पोलीस स्टेशन

Leave A Reply

Your email address will not be published.