अलखीजर सोसायटीच्यावतीने फैजपूर येथे शिरखुरमा साहित्य वाटप

0

फैजपूर प्रतिनिधी:कोरोना महामारी संकटकाळात शासनाने कडक निर्बंध लागू केले असल्याने मजूर कष्टकरी वर्ग कामधंदे बंद असल्याने आर्थिक अडचणीत आला आहे.अशा परिस्थितीत  पवित्र रमजान ईद निमित्त निराधार व गरीब, गरजू लोकांना अलखिजर सोसायटीच्या वतीने शिरखुरमा साहित्य (किट) वाटप करण्यात आले.

दिनांक १३/५/२०२१/चे ३० रमजान (चांदरात) रोजी अल खिजर सोसायटी तर्फे फैजपूर येथील २४६ विधवा महिला,निराधार महिला व पुरुष गरीब लोकांना शिरखुरमा चे सामान ( किट) अल खिजर तर्फे सोसायटी चे अध्यक्ष डॉ.दानिश शेख,उपाध्यक्ष मुजम्मील काजी,सचीव शेख एजास सह सचिव अल्ताफ खान,खजिनदार रफिक सर,सल्लागार मोहम्मद अख्तर सर यांच्या हस्तेवाटप करण्यात आले.तसेच शेख आरिफ शेख उस्मान,फहीम शेख फहीम कुरेशी.शेख शोयब शेख रशिद शेख मतीन शेख शाहरुख नासीर भाऊ जलिल भाऊ यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.