दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ६१८ नव्या रुग्णांनी नोंद, ६७० कोरोनामुक्त

0

जळगाव  प्रतिनिधी : आज सलग जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. तसेच आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जळगाव शहरासह कोणत्याही तालुक्यात नव्या रुग्णसंख्येने शंभरी पार केली नाही. आज दिवसभरात ६१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ६७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

मागील महिन्यापासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होतानाचे दिसून येत आहे. तसेच मृताच्या आकडेवारीतही घट होतानाचे दिसून येत आहे. आठवडाभरापासून ही स्थितीही सुधारली. आज आढळून आलेल्या रुग्ण संख्येनंतर जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या  १ लाख ३४  हजार ५११ वर पोचली. तर ६७० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २२ हजार ४५२ वर पोचला आहे.तर आज ११ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २४०६ वर गेला आहे, जिल्ह्यात सध्या ९६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ६६, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५७, अमळनेर ३९, चोपडा ८५, पाचोरा ०६, भडगाव ०४, धरणगाव ३५, यावल ३४, एरंडोल ४५, जामनेर ६०, रावेर ३२, पारोळा ००, मुक्ताईनगर ३२, बोदवड ३३, अन्य जिल्ह्यातील ०४.

Leave A Reply

Your email address will not be published.