जळगाव जिल्ह्यात १७ मेपासून आणखी कडक निर्बंध ; जाणून घ्या काय असणार?

0

जळगाव प्रातिनिध : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होतानाचे दिसून येत आहे. ही कोरोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी जिल्ह्यात आधीपेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. १७ मे पासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंध दिनांक 01 जून, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपावेतो राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून प्राप्त झाले आहे

काय आहेत नियम?

– जळगांव जिल्हयात वाहतूकीच्या कोणत्याही माध्यमातून परराज्यातून येणा-या / दाखल होणा-या सर्व नागरिकांना राहतील. महाराष्ट्रात दाखल होण्याच्या वेळेच्या 48 तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगिटिव्ह अहवाल सांबत बाळगणे बंधनकारक राहील.

 

– कोंगों वाहतुकीच्या संदर्भात संबंधीत वाहनामधून केवळ दोन व्यक्तींनाच ड्रायव्हर क्लीनर / हेल्पर) प्रवास करण्याची मुभा राहील. परराज्यातून जळगांव जिल्हयात दाखल होणा-या काँगी वाहतूकी संदर्भात संबंधीत ड्रायव्हर + क्लीनर हेल्पर यांना महाराष्ट्रात दाखल होण्याच्या वेळेच्या 48 तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगिटिव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील आणि सदरचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पुढील सात दिवसाकरीताच वैध राहील.

 

-जळगांव जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नागरिकांची / किरकोळ विक्रेत्यांची अनावश्यक गर्दी होणार नाही याबाबत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव यांनी बाजार समित्यांमधील विक्रांच्या ठिकाणांचे /स्थानाचे विकेंद्रीकरण करावे. बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात आवक असणाऱ्या भाजीपाला/फळे / धान्य यांच्या विक्रीच्या व लिलावाच्या वेळा देखील ठरवून देण्यात याव्यात, जेणेकरुन एकाच वेळेस मोठया प्रमाणात गर्दी होणार नाही. सदर निर्देशांचे पालन न झाल्यास व कोविड 19 नियमावलीचे उल्लंघन होवून बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आल्यास संबंधित बाजारसमिती बंद करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.

 

-दुधाचे संकलन वाहतूक व प्रोसेसिंग प्रक्रीया अबाधितपणे सुरु राहील. तथापि किरकोळ दुध विक्री व घरपोच दुधाचे वितरण हे यापूर्वीच्या आदेशानुसार सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या वेळेत सुरु राहील. मात्र दुधाचे संकलन व घरपोच वितरण या सुविधा सायंकाळी 06.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुध्दा देता येतील. तथापि, दुध संकलन केंद्रावरुन दुध / दुग्धजन्य पदार्थ वगळता इतर पदार्थांची विक्री करता येणार नाही. तसेच दिनांक 22 एप्रिल, 2021 व दिनांक 30 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशानुसार लाग करण्यात आलेल्या निबंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

 

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्तो व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.