पारोळा येथील यात्रोत्सवाला परवानगी मिळणार का?

0

पारोळा (अशोककुमार लालवाणी), लोकशाही न्यूज नेटवर्क 

संपूर्ण  खान्देशात प्रसिध्द असलेल्या पारोळा येथील  रथोत्सव व यात्रोत्सव यंदा तरी साजरा होणार का ? असा प्रश्न सध्या तालुक्यासह राज्यातील भाविकांना पडला आहे.

मागील दोन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही काळ सोडला, तर मागील दोन वर्षापासुन राज्यातील शाळा व मंदिरे ही बंदच आहेत. परंतु दि. २४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने दि. ४ आक्टोंबर पासुन शाळा व दि. ७ आक्टोबर पासुन राज्यातील मंदिर उघडण्याची घोषणा केली आहे.  म्हणजेच घटस्थापनेपासुनच पारोळा येथील  प्रसिध्द यात्रोउत्सव सुरू होतो. या मंदिरे उघडण्याच्या घोषणेने तालुक्यासह राज्यातील भाविकांच्या आशा उंचावल्या आहेत की,  यंदा तरी पारोळा येथील  यात्रोउत्सव व श्रीं च्या दर्शनाचे भाग्य लाभेल व  रथोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होईल?

राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने अनेकाचे रोजगार ही बंद आहेत. तसेच अनेक ठिकाणी भरणारे यात्रोत्सव ही बंद असल्याने तेथील  स्थानिक व्यापाऱ्यांसह  ठिक ठिकाणी जाऊन व्यापार करणाऱ्यांना  याचा फार मोठा फटका बसला असुन आता मंदिरे उघडण्याच्या घोषणेने तिथे सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या  आशा पल्लवीत झाल्या आहेत.

परंतु जोपर्यंत नविन नियमावली येत नाही तो पर्यंत काहीच सांगता येत नाही.  नविन नियमावली आल्यावरच पुढील ते काय ठरणार आहे. सध्यातरी अनेकांच्या  आशा  उंचावल्या आहेत. पुढे काय होईल हे येणार काळच ठरवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.