पारोळा तालुका काँग्रेसतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलदाराना निवेदन

0

पारोळा (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाचा महामारिने संपुर्ण जग त्रस्त आहे या संकटाने लाखो लोकांच्या रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करीत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओडवले आहे या दुहेरी संकटाचा सामना करतांना जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. सात जुन दोन हजार वीस पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवार पर्यंतचे ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर नऊ रुपये बारा पैसे तर डिझेलमध्ये अकरा रुपये एक पैशांची वाढ करण्यात आलेली आहे.

देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रचंड प्रतिलिटर ८७ रुपये ८८ पैश्याच्या ही पुढे गेले आहेत दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग झाले आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्यांच्या थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर वाढवले जात असताना सध्या ती पारदर्षता राहिलेली नाही. २०१४ मध्ये पेट्रोल वर उत्पादनशुल्क हे ९:४० पैसे तर डिझेलवर ३रुपये५६ पैसे होते सध्या हे शुल्क पेट्रोलवर ३२ रुपये ९८पैसे तर डिझेल ३१ रुपये ८३ पैसे असे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल डिझेल चा किमती कमी करून सामान्य जनतेला त्याच्या लाभ देणे सहज शक्य आहे परंतु मोदी सरकार हेतु पुरस्पर सामान्य जनांना जिझिया कर लादत असून सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना हे भारताचे पंतप्रधान म्हणुन मोदी सरकारला शोभनीय नाही ह्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या पारोळा तालुका काँग्रेस कमिटी जाहीर निषेध करते.

निवेदन देतेवेळी पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान अल्पसंख्यांक अध्यक्ष शाहिद का बेलदार अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश भोई, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष आनंदा अशोक अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सदरचे निवेदन पारोळा तहसीलदार अनिल गवांदे यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.