इंधन दरवाढ रद्द करावी यासाठी काँग्रेसचे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन

0

जामनेर (प्रतिनीधी):इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी यासाठी केंद्र सरकारच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतीने जामनेर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले .आणि सदर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ए.डी.हिरे याना देण्यात आले.

संपूर्ण देशाला”कोरोना” या संकटाने ग्रासलेले असतांना केंद्र सरकारने आपत्ती काळात सर्वसामान्य जनतेला पर्यायाने संपूर्ण देशाला मदतीचा हात पुढे करायला पाहिजे असतांना, केंद्र सरकार मात्र दिवसागणिक पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनात प्रचंड दरवाढ करून जनतेला पर्यायाने देशाला वेठीस धरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी संपूर्ण देशात काँग्रेस आघाडी सरकारने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन छेडले आहे. याच विषयास अनुसरून जामनेर तालुका काँग्रेस आघाडीच्या वतीने जामनेर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की-केंद्र सरकारने दिवसागणिक होणारी पेट्रोल-डिझेल ची दरवाढ रद्द करून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे,तसेच “कोरोना”संकटात महाराष्ट्र राज्य सरकारशी दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप करत केन्द्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ जामनेर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

याआंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने देखील पाठिंबा दिला होता.या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष-शरद पाटील, मूलचंद नाईक(प्रदेश सदस्य), गणेश झाल्टे(शहराध्यक्ष), मुसा पिंजारी, रफिक मौलाना, रा-कॉ-चे-पप्पू पाटील, प्रल्हाद बोरसे, प्रभू झाल्टे, शिवसेनेचे-विश्वजित पाटील, भरत पवार यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.