पातोंडा विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर

0

पातोंडा ता.चाळीसगाव (वार्ताहर) : येथील विद्यालयात विधिसेवा प्राधिकरण चाळीसगाव व चाळीसगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर 2020 याचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक  ऐ. ई.चौधरी व पर्यवेक्षिका के.वाय. देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऐ.ई.चौधरी यांनी सादर केले. अँड.संदीप सोनार यांनी मोटर वाहन कायदा व रस्ते अपघात याविषयी माहिती दिली. अँड.जितेश पोतदार (सचिव-चाळीसगाव वकील संघ) यांनी भारतीय संविधान व त्यातील नागरिक हक्क व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती पाढेंण साहेब यांनी संविधान महात्म्य त्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये याखेरीस रस्ते अपघात टाळण्यासाठी कायद्याच् पालन करणे किती गरजेचे आहे? या विषयी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी श्री. गांधे साहेब( व.न्यायाधीश चाळीसगाव )अँड.प्रमोद आगोणे (अध्यक्ष-चाळीसगाव वकील संघ), पर्यवेक्षिका ताईसो.के.वाय. देशमुख,अँड.कविता जाधव,अँड.वैशाली कांदळकर आदी उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.