पाच नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत १० डिसेंबरला होणार सुनावणी

0

जळगाव – मनपाच्या घरकुल घोटाळ्यातील पाच नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत १० डिसेंबरला सुनावणी होणार आहे .
घरकुल घोटाळ्यात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा सुनावलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. गटनेते भगत बालाणी, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी मागणी यात करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान पाचही नगरसेवक न्यायालयात हजर झाले होते. या वेळी नगरसेवकांनी वकील लावण्यासाठी मुदत मागितलीअसून महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या वकिलांनी कागदपत्र मिळवण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार आज सुनावणी झाली.
आजच्या सुनावणीत संबंधीत नगरसेवकांच्या वकिलांनी कागदपत्रे जमा करून पुढील तारीख मागितली. यानुसार न्यायाधिशांनी १० डिसेंबर ही तारीख दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.