डॉक्टर उल्हास पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव

0

जळगाव- जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात चालवली जाणारी एकमेव वैद्यकीय संस्था म्हणून डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय असून कोविड या महामारी मध्ये शासनाला १००℅ सहाय्य करणारी ती एकमेव वैद्यकीय संस्था ठरली असून त्याच सोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुद्धा कार्य त्यांनी हाताळले व रुग्णांना सेवा दिली त्याबद्दल अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांचा जळगाव कोविड केअर युनिट व नशिराबाद मन्यार बिरादरी तर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मार्च महिन्यात अकस्मातपणे लॉक डाऊन घोषित झाल्यावर कोविंड संशयास्पद व पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अपूर्ण पडल्याने व इतर खाजगी रुग्णालयांनी शासनाला असहकार्य दर्शीवल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव चे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्वरित जळगावकरांच्या सेवेसाठी सदर महाविद्यालय व तेथील स्टाफ उपलब्ध असून त्यांनी त्वरित सेवा देण्याची तयारी दर्शविली त्या दिवसा पासून आज पर्यंत डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णा सोबतच नॉन कोविड व जिल्हा सामान्य रुग्णालयाची भूमिका पार पाडत आहे.

रुग्णांची सेवा हेच माझे कर्तव्य -डॉ. पाटील
शनिवारी जळगाव कोविड केअर युनिट चे संस्थापक समन्वयक फारुक शेख, औशोधोपचार वाटप समितीचे प्रमुख अतिक शेख, नशिराबाद बिरदारीचे प्रमुख रियाज शेख व इस्माईल शेख यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन पाहणी, तपासणी व रुग्णां सोबत चर्चा केली असता जे खरोखरच गरीब रुग्ण होते परंतु त्यांच्याकडे योजने च्या माध्यमातून खर्च करण्या साठी कागदपत्र नसल्यामुळे अथवा त्या कागदपत्रात तांत्रिक दुरुस्तीमुळे ते योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांना खर्च करणे परवडत नव्हते म्हणून डॉक्टर उल्हास पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी त्वरित त्या तिन्ही लहान बाळा ची फी माफ केली.

आजही समाजातील गोरगरीब व्यक्तींकडे रेशन कार्ड व आधार कार्ड नाही असल्यास त्यावर आडनाव नावांमध्ये तफावत किंवा पत्ता बदललेला असतो त्यामुळे त्या योजनेत रुग्णाला सवलत मिळत नाही.
वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल चालवण्यासाठी पैशांची सुद्धा गरज असल्याने डॉक्टर पाटील वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा पैसे आकारते त्या मुळे समाजात गैरसमज निर्माण होतो म्हणून जेव्हा आम्ही डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा ज्या ठिकाणी योजनेला शासकीय मान्यता आहे त्या ठिकाणी जाताना आपल्याजवळ आधार कार्ड रेशन कार्ड न चुकता घेऊन जाणे असे आवाहन सुद्धा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केलेले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.