पाचोऱ्यात इलेक्ट्रोहोमीओपॅथी मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबीर संपन्न

0

 पाचोरा (प्रतिनिधी) :  येथील भडगांव रोडवरील दैवयोग पाटील मंगल कार्यालयात  नुकतेच इलेक्ट्रोहोमीओपॅथी चे जनक डॉ. काऊंट सिझर मॅटी यांच्या २११ वी जयंती निमित्त मोफत रोगनिदान व इलेक्ट्रोहोमीपॅथी औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन डॉ. काऊंट सिझर मॅटी यांचे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.

शिबिराचे अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे तर प्रमुख उपस्थितांमध्ये माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णु बी. पाटील, डॉ. सुनिल पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. नरेश गवांदे, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. अविनाश शर्मा, डॉ. जीवन पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, डॉ. दिनेश सोनार, डॉ. अनिल महाजन हे होते. इलेक्ट्रोहोमीओपॅथी शास्त्रास राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रात राजमान्यता मिळवुन देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करुन गोर – गरिबांना याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे  माजी आमदार दिलीप वाघ यांनी यावेळी सांगितले. डॉ. काऊंट सिझर मॅटी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत इलेक्ट्रोहोमीओपॅथी शास्त्रा संबंधीत माहिती डॉ. मच्छिंद्र कोष्टी यांनी दिली. यावेळी डॉ. नरेश गवांदे, डॉ. प्रविण माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २५० रुग्णांची तपासणी ही तज्ञ डॉ. मच्छिंद्र कोष्टी, डॉ. महेंद्र बयास व डॉ. संतोष पाटील यांनी करुन रुग्णांवर उपचार केले. शिबिराचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश विष्णु पाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ. यशवंत पाटील व डॉ. अतुल पाटील यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी पाचोरा, भडगाव व सोयगाव तालुका इलेक्ट्रोहोमीओपॅथी चिकित्सक संघटनेच्या सर्व डाॅक्टर्स व त्यांच्या टिमने परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार डॉ. जीवन पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.