पाचोरा शहरात सायंकाळी ५ वाजेनंतर सुरु असलेल्‍या दुकाने, हॉटेल्‍सवर धडक कारवाई

0

पाचोरा (प्रतिनिधी) : संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणुची साथ झपाटयाने पसरत आहे.  त्‍यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी, जळगांव यांचे आदेशानुसार शहरातील मेडीकल व दुग्‍ध व्‍यवसाय वगळता इतर व्‍यवसाय /आस्‍थापना / दुकाने / प्रतिष्‍ठाने ही सायंकाळी ५ वाजेनंतर सक्‍तीने बंद ठेवणे बाबत तसेच प्रत्‍येक नागरीकांनी चेह-यावर मास्‍क लावणे सक्‍तीचे असल्‍याबाबत आदेश असुन देखील पाचोरा शहरात दि. ३ जुलै रोजी अचानक उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केलेल्‍या संयुक्‍त धडक मोहीमेत सायंकाळी ५ वाजेनंतर सुरु असलेल्‍या शहरातील दाजीबा हॉटेल यांना रक्‍कम रुपये ५ हजार रुपये, भडगांव रोडवरील श्रीराम ट्रेडींग कंपनीस ५०० रुपये व कुंवर पावभाजी सेंटरला ५०० रुपये त्‍याच प्रमाणे चेह-यावर मास्‍क न लावलेल्‍या अदमासे १३ व्‍यक्‍तींकडून एकूण ११ हजार ५०० रुपये रकमेचा दंड वसुल करण्‍यात आला. सदरची मोहीम ही उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, नगरपरिषदेच्‍या मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांच्‍या नेतृत्‍वात करण्‍यात आली असुन धडक कारवाई पथकात अभियंता मधुकर सुर्यवंशी, हिमांशु जैस्‍वाल, दत्‍तात्रय जाधव, विलास देवकर, भागवत पाटील, दत्‍तात्रय पाटील, महेंद्र गायकवाड, अनिल वाघ, संजय जगताप, गणेश अहिरे, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, गोविंदा पारोचे, सचिन कंडारे, आकाश खेडकर, शरीफ खान आदी कर्मचारी यांचा समावेश होता.

यापुढे देखील नागरीकांनी शासनाने दिलेल्‍या आदेशाचे व वेळेचे पालन न केल्‍यास मोहीम अधिक तीव्र करणार असुन या धडक कारवाईत कुणाचीही गय केली जाणार नसुन नागरीकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्‍यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.