…अखेर पारोळा बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

0

पारोळा (प्रतिनिधी) मागील तीन ते साडेतीन महिन्यापासुन पारोळा येथिल बाजार पेठ बंद होती. मध्यंतरी काही दिवस बाजार पेठ उघडली व त्यात ४ ते ५ दिवसातच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी औत्तर गल्ली येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने संपुर्ण बाजार पेठ शासन निर्णया नुसार कंन्टमेंट झोन म्हणुन चहुबाजुनी पत्रे लावुन बंद करण्यात आली.

तसेच हळुहळु या बंद बाजार पेठेचे चटके सर्वसामान्य नागरिकांना बसायला लागले तर दुसरी कडे अनेक व्यापारी ही अडचणीत येऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. पारोळा येथिल बाजार पेठ कशी सुरू होईल याचे प्रयत्न व्यापारी महासंघाने सुरू केले. यात स्थानिक प्रशासना पासुन तर जिल्हाअधिकारी पर्यंत चे सर्व प्रयत्न करण्यात आले.

तसेचअनेक राजकिय व्यक्तीनाही निवेदने देण्यात आली त्या निवेदनाची दखल येथिल माजी पालकमंत्री सतिष अण्णा पाटील यांनी घेतली व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला व जळगाव जिल्हाअधिकारी अभिजित राऊत याना ही पारोळा येथिल बाजार पेठ लवकरात लवकर कसे सुरळीत होईल यांची माहित घेत चर्चचे अंती शुक्रवार दि,३ पासुन पारोळा येथिल बाजार पेठे सुरू झाली व पारोळा बाजार पेठेने मोकळा श्वास घेतला कारण कन्टेमेंट झोन घोषीत होताच शहरातील एकमेव बाजार पेठ ही शासन निर्णयानुसार चहोबाजुनी पत्रे लावुन बंदिस्त करण्यात आली होती.

बाजारपेठ उघडताच हे सर्व पत्रे काढुन टाकण्यात आल्याने बाजारपेठे ने मोकळा श्वास घेतल्या चे जाणवले,तसेच अनेक व्यापाऱ्यांनी माजीपालक मंत्री सतिष अण्णा पाटील यांचे आभार माणून ज्यांनी ज्यांनी व्यापारी व नागरिकांना सहकार्य केले त्या सर्वांचे शहर वासिंयानी आभार मानले आले.

Leave A Reply

Your email address will not be published.