पाचोरा येथे सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या वतीने मिनी लायब्ररीचे उद्घाटन

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथील सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या द्वितीय वर्धापन दिवसानिमित्त दि. ३ मार्च २०२१ रोजी पाचोरा येथे साजरा करण्यात आला.

यावेळी कराटे स्पर्धेमध्ये मध्ये कलर बेल्ट परीक्षा उत्तीर्ण  झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला असून स्व. हिलाल भावजी पाटील बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने मिनी लायब्ररी चे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वप्रथम छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिष्ठित विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून एस. के. पाटील मराठा सेवा संघ जिल्हा उपकार्याध्यक्ष तसेच शितल मोरे, जिजाऊ ब्रिगेड पाचोरा उपशहर अध्यक्ष दीपक पी. पाटील, राजेंद्र सु.पाटील (सचिव) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योजक मनोज शांताराम पाटील, पाचोरा या मान्यवरांनी स्व. हिलाल भावजी पाटील बहूउद्देशीय या संस्थेस १० हजार रुपये  मिनी लायब्ररी साठी स्पर्धात्मक पुस्तके भेट म्हणून दिले असून याबाबत आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.