पाचोरा बस आगारातील अधिकारी, कर्मचारी व नागरीकांची कोवीड तपासणी

0

पाचोरा  –  जळगांव जिल्हयात सप्टेंबर महिन्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निदर्शनास आले आहे. तथापी जागतिक स्तरावरील कोविड उद्रेकाचे अवलोकन केले असता कोविड आजाराची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या पार्श्वभुमीवर व्यवसायाच्या दृष्टीने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क अधिक असतो अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने हात असल्याचे देखील निदर्शनास आलेले आहे. करीता पाचोरा नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांच्या संयुक्तीकरित्या पाचोरा बस आगार कार्यालयात कोरोना तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, प्रवासी व सदर परिसरातील नागरीकांच्या चाचणी करण्यात आली यांत कर्मचारी व नागरीक यांचेकडून चांगला प्रतिसाद लाभुन सुमारे ११३ चाचण्या करण्यात आल्यात. नागरीकांनी देखील स्वत: जागरुक राहून आपणहुन पुढे येऊन चाचणी करीता नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या ठिकाणी चाचणी करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केलेले आहे.

सदर शिबीराचे वेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, डॉ. सुनिल गवळी, गजानन काकडे, भुषण पाटील, आकाश खैरनार, गणेश अहीरे, नरेश आदिवाल, प्रकाश लहासे, विठ्ठल पाटील, अनिल डागोर, आशा कर्मचारी करुण कुमावत आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.