पाचोरा पोलिसांनी दोन चोरट्यांना केले जेरबंद

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढ होत असतांनाच पाचोरा पोलिसांना दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या चोरट्यांकडुन इन्व्हरटर बॅटरी व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे प्रमुख राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार, संदिप सोनवणे यांना दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

दि. ६ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील बळीराम नगर मधील रहीवाशी रामकृष्ण कौतिक पाटील यांचे घरासमोरील पोर्चमधील १५ हजार रुपये किंमतीची इन्व्हरटर बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरट्यांनी चोरुन नेली होती. याबाबत रामकृष्ण पाटील यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. याचा पाठपुरावा करत पाचोरा पोलिसांनी शेख कलीम शेख गुलाब (वय – ३५) रा. जारगांव व जुम्मा शहा मौलाशा फकीर (वय – ३७) रा. खडकदेवळा ता. पाचोरा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली देत त्यांचे कडील पांढऱ्या रंगाची १५ हजार रुपये किंमतीची एस्काॅर्ट ट्युबलर बॅटरी व एम. एच. १९ एन. के. २६१३ क्रमांकाची मोटरसायकल ताब्यात घेण्यास पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस काॅन्स्टेबल (डी.बी) राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार, संदिप सोनवणे यांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.