पाचोरा पिपल्स को.ऑफ बँक निवडणुक खर्चात अपहार?

0

पोलिस उपनिरीक्षक यांच्याकडून जिल्हा उपनिबंधक यांना पत्र

यावल दि.3(ता.प्र.) पाचोरा पिपल्स को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुक खर्चात तत्कालीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगांव प्रताप पाडवी व तथाकथीत श्री.समर्थ टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स रा.आदर्शनगर जळगांव व कपिल प्रिंटर्स प्रो.प्रा.विलास जोगेंद्र बेंडाळे यांनी अपहार केला आहे किंवा नाही आणि अपहार केला असल्यास पाचोरा पोलिस स्टेशनला हजर होऊन गुन्हा दाखल करावा असे पत्र पाचोरा पिपल्स पी.एस.आय.नलवाडे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिले

दिनांक 20/06/2019 रोजी पी.एस.आय.दत्तात्रय नलावडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,उपरोक्त विषयान्वये सविनय सादर आहे की, अर्जदार सुरेश जगन्नाथ पाटील (पत्रकार) रा.भुसावळ रोड,यावल भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास आण्णा हजारेकृत,जळगांव व पंकज श्रावण सोनार रा.यावल जि.जळगांव यांनी दिनांक 12/11/2018 रोजी मा.पोलीस अधिक्षक सो.,जळगांव यांनी गैरअर्जदार 1) श्री.प्रताप बाबा पाडवी (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,जळगांव) 2) श्री समर्थ ट्रुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स, रा.48 पांडव, आदर्श नगर,जळगांव 3) कपिल प्रिंटर्स प्रो.पा.विलास जोगेंद्र बेंडाळे, यांच्याविरूध्द तक्रारी अर्ज दिला असून आमचे कडेस चौकशीस आहे.

सदर अर्जाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र.1 यांनी पाचोरा पिपल्स को.ऑप बँक पंचवार्षिक निवडणुकीत सन (2011/12 ते 2015/16) निवडणुक निर्णय अधिकारी असतांना भ्रष्टाचार व अपहार केलेबाबत अर्जात नमुद केले असून गैरअर्जदार क्र. 2 व गैरअर्जदार क्र.3 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे सोबत संगनमत करून सदर भ्रष्टाचार व अपहार केल्याचे नमुद केले आहे.

सदर अर्जासोबत अर्जदार यांनी दिनांक 01/12/2014 रोजी एस.एन.पवार (विशेष लेखापरीक्षक) वर्ग-1 सहकारी संस्था फिरते पथक नाशिक विभाग,नाशिक यांनी मा.विभागीय सह निबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांना श्री.प्रताप बी पाडवी, सहाय्यक निबंधक,जळगांव यांना निलंबित करणेबाबत सादर केलेला चौकशी अहवाल,जिल्हा निवडणुक अधिकारी अधी संस्था तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,जळगांव यांनी श्री.प्रताप बी.पाडवी, सहाय्यक निबंधक,जळगांव दिनांक 09/09/2011 रोजी दिलेला आदेश, पाचोरा पिपल्स को ऑप.बँक लि.पाचोरा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन 2011/1, 2015/16 निवडणक खर्च पावती तपशिल, निवडणुक खर्चास मान्यता दिले बाबत जिल्हा निबंधक सहकारी संस्था,जळगांव यांचे दिनांक 19/12/2019 रोजी पत्र, गैरअर्जदार क्र.1 यांनी जिल्हा निवडणुक अधिकारी अधि संस्था,यांना दिनांक 03/12/2011 रोजी सादर केलेला पाचोरा पिपल्स को ऑप.बँक लि.पाचोरा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक खर्च अहवाल कपिल प्रिंटर्सचे व्हाऊचरर्स, आर.एल.चव्हाण दुकान निरीक्षक, पाचोरा यांचे पत्र निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पाचोरा पिपल्स को ऑप. बँक लि.पाचोरा चे बँक स्टेटमेंट, मुख्याध्यापक सु.भा.पा.प्राथमिक विद्या मंदिर,पाचोराचे पत्र, व्यवस्थापक महालपुरे मंगल कार्यालय,पाचोरा यांचे कोटेशन श्री.समर्थ टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या पावत्या, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी लिहुन घेतलेल्या नावे पावत्या, एस.एच.चव्हाण सरकारी कामगार अधिकारी,जळगांव यांनी माहितीचे अधिकारात दिलेली माहिती. प्रादेशिक परीवहन अधिकारी, जळगांव यांनी MH19 9998 या वाहनाची पुरविलेली माहिती, वर्तमान पत्राचे कात्रणे, व्ही.आर.देशमुख (उपनिबंधक दक्षता कक्ष, सहकारी संस्था) महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी मा.विभागीय सह.निबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांना श्री.प्रताप बी.पाडवी (सहा निबंधक,जळगांव) यांना निलंबित करणेबाबत दिनांक 05/02/2015 रोजी पाठविलेले पत्र याच्या प्रति जोडलेल्या आहेत.

वरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता व दिनांक 01/12/2014 रोजी एस.एन.पवार (विशेष लेखापरीक्षक) वर्ग-1 सहकारी संस्था फिरते पथक नाशिक विभाग नाशिक यांनी केलेल्या चौकशी अहवालावरून गैरअर्जदार 1) श्री.प्रताप बाबा पाडवी  (सहा.निबंधक सहकारी संस्था,जळगांव) 2) श्री.समर्थ टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स, रा. 48 पांडव आदर्श नगर, जळगांव 3) कपिल प्रिंटर्स, प्रो.प्रा.विलास जोगेंद्र बेंडाळे यांनी पाचोरा पिपल्स को.ऑप बँक लि. पाचोरा येथे संगनमताने भ्रष्टाचार व निवडणुक खर्च कामी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या खात्यावरील रक्कमेचा अपहार केला आहे किंवा नाही याबाबत आपले स्पष्ट मत लवकरात लवकर मिळण्यास विनंती आहे. वरील गैरअर्जदार यांनी भ्रष्टाचार किंवा अपहार केला असल्यास आपण किंवा आपल्या प्रतिनिधी मार्फत पाचोरा पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर होऊन गुन्हा दाखल करावा असे दिलेल्या पत्रात पी.एस.आय.नलावाडे यांनी म्हटले आहे जिल्हा निबधक जळगांव मेघराज राठोड काय निर्णय घेतील याकडे संपुर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष्य वेधुन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.