पाचोरा नगरपरीषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर बागवान

0

पाचोरा (प्रतिनिधी) : 

पाचोरा येथील नगरपरीषदेच्या स्विकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी बशीर बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी आमदार दिलीप वाघ यांनी बागवान यांच्या नावाची घोषणा केली. अनेक वर्षानंतर मुस्लिम समाजाला न्याय मिळाल्याने समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.

स्विकृत नगरसेवक रणजीत पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने बागवान यांना संधी देण्यात आली. स्विकृत सदस्य निवडीनंतर बागवान यांचा दिलीप वाघ यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी विधानसभा शेत्र अध्यक्ष नितीन तावडे, पी. टी. सी.चे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, अजहर खान, सतीष चौधरी, विकास पाटील, रणजीत पाटील, सुनील शिंदे, वासुदेव महाजन, भुषण वाघ, अॅड. अविनाश सुतार, सत्तार पिंपरी, मोहमद मिस्तरी, हरुण देशमुख, कासम खान सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.