पाचोरा नगरपरिषदेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  दि. २६ फेब्रुवारी रोजी पाचोरा नगरपरिषदेने शहराच्या विकासाला गती देण्याकरीता सन – २०२१ – २०२२ या वर्षासाठी लोकाभिमुख असे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्याकरीता ऑनलाईन पध्दतीन सभा घेण्यात आली. पाचोरा नगरपरिषदेच्या महसुली जमा व भांडवली जमा तसेच महसुली खर्च व भांडवली खर्च एकत्रित २०४ कोटी रुपयांचा एकूण अर्थसंकल्पीय अंदाजपत्रासह ६ कोटी ८० लाख रुपये शिलकी अंदाजपत्रकास दि. २६  रोजी फेब्रुवारी रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सदरच्या अंदाजपत्रकातील जमा खर्च बाबतच्या मुख्य तरतूदी पुढील प्रमाणे आहेत.

महत्वाच्या तरतुदी

नगरपरिषद निधी व इतर निधीतून अंदाजपत्रकात उल्लेखनीयरित्या तरतुद करण्यात आलेल्या कामाचा तपशील खालील प्रमाणे आहे –

पाऊसपाणी निचरा, गटारी बांधकाम करणे २० कोटी रुपये, नविन रस्ता १५ कोटी रुपये, रस्ते दुरुस्ती १ कोटी ५० लाख रुपये, जमीन संपादन ५ कोटी रुपये, नगरोत्थान योजना ५ कोटी रुपये, दलित वस्ती योजनेअंतर्गत कामे ५ कोटी रुपये, दलितेतर वस्ती योजनेअंतर्गत कामे ३ कोटी रुपये, विशेष रस्ता निधी १० कोटी रुपये, न. पा. इमारत बांधकाम ३ कोटी ५० लाख रुपये, दलितेतर वस्ती निधी २ कोटी ५० लाख रुपये, अल्पसंख्यांक निधी  ४० लाख रुपये, दिव्यांग कल्याण निधी २५ लाख रुपये, कोवीड – १९ उपाययोजना (आरोग्य) ४५ लाख रुपये, महिला व बालकल्याण २० लाख रुपये, उपरोक्त महसुली जमा व भांडवली जमा तसेच महसुली खर्च व भांडवली खर्च एकत्रित रक्कम रूपये २०४ कोटी चे रक्कम रूपये ६ कोटी ८० लाख रुपये मात्र शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास न. पा. सर्वसाधारण सभेद्वारे मान्यता देण्यात आली. सदरचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली लेखापाल दत्तात्रय जाधव, अंतर्गत लेखापरिक्षक नितीन लोखंडे, वरिष्ठ लिपीक, सुधीर पाटील यांनी सादर केले. यावेळी ऑनलाईन सभेस नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील व  सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.