पाचोरा आगारात सडक सुरक्षा जिवन रक्षा सप्ताहस सुरूवात

0

पाचोरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी प्रवासी सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. चालु वर्षी सुरक्षा सप्ताह सुरक्षा सप्ताह हा १८ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान साजरा होत असुन या दरम्यान चालक वाहक यांना सुरक्षीत प्रवास बाबत मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केले जातात.

दिनांक २१ जानेवारी रोजी पाचोरा आगारात सुरक्षा सप्ताह च्या निमित्ताने पाचोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  दत्तात्रय नलावडे यांनी सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहून कर्मचारी व प्रवासी यांना मार्गदर्शन केले. प्रथम दत्तात्रय नलावडे यांचा आगार प्रमुख निलीमा बागुल (इसे) यांनी पुष्प देउन सत्कार केला. तद्नंतर सुरक्षा सप्ताहाची फित कापुन मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तात्रय नलावडे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी मनोगत व्यक्त  करतांना सांगितले की, चालक वाहक हा महामंडळाचा कणा असुन महामंडळाची लालपरी रस्त्यावर आली की महाराष्ट्राच्या अर्थकारणास गती प्राप्त होते. लॉकडाउन काळात देखील एस. टी. बंद होती त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळले होते. मात्र एस. टी. सुरू होताच पुर्वी प्रमाणे जनजीवन सुरळीत झाले. आजही प्रवासाला निघतांना प्रवासी जनता एस. टी. बसच्या भरवश्यावर प्रवासाला निघतात. तसेच सुरक्षित प्रवास, नियमांचे पालन प्रवासी जनतेने करावयाचे सहकार्य आदी बाबत मार्गदर्शन केले. शेवटी आगार प्रमुख निलीमा बागुल (इसे) यांनीही मार्गदर्शन करतांना मनोगत व्यक्त करतांना चालक वाहक यांना सुरक्षित सप्ताह दरम्यान घ्यावयाची दक्षता, नियोजन, नियमांचे पालन आदी विषयांवर मार्गदर्शन करुन पाचोरा आगारातील उपस्थित चालक दिपक बोरसे आणि सुनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी वरीष्ठ लिपीक रविंद्र पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आगार प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करुन सरक्षा सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला.

प्रसंगी पाचोरा डेपोचे स.का.अ. योगेश जाधव, लिपीक संदीप पाटील भिमराव जाधव आदी कर्मचारींनी कार्यक्रमेच्या यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.