धनंजय मुंडेंना मोठा दिलासा ; रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मागे घेतल्याचे वृत्त आहे.

 

कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे

 

दरम्यान, रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.