पांझरा काठावर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

0

एनडीआरएफचे निरीक्षक कैलास पवार यांचे मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मुडी येथे २८ रोजी ग्रामस्थ त्यांच्या दिनचर्येत व्यस्त असतांना नदी पोहत असलेले ४ जण वाचवा वाचवा अशा हाका मारू लागल्याने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला.ग्रामस्थांनी नदीकाठाकडे धाव घेतली असता त्यांना निदर्शनास आले की, आपत्ती व्यवस्थापन टीम ने बुडणाऱ्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यासोबतच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उद्धभवल्यावर काय दक्षता घेतली पाहिजे याचे देखील प्रशिक्षण ग्रामस्थांना दिले गेले.यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे पोलीस निरीक्षक कैलास पवार यांनी प्रशिक्षण दिले.प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,न.पा.प्रशासन अधिकारी संजय चौधरी,महेंद्र पाटील,तसेच पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन हजर होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.