पांझरा आणि बोरी नदीपात्रातुन होणाऱ्या अवैध वाळू उपश्यावर धाड

0

प्रशासनाने केली धडक कारवाई

अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वाळू चोरांचा सुळसुळाट वाढला असून तहसीलदाराच्या पथकाने भरदिवसा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 8 टेम्पो व एका ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे.

तहसीलदार मिलिंद वाघ यांचे पथक मंडलाधिकारी पी एस पाटील,शहर तलाठी गणेश महाजन, आशिष पारधे, प्रथमेश पिंगळे, हर्षवर्धन मोरे, धीरज देशमुख, स्वप्नील कुलकर्णी यांनी 3 रोजी सकाळी साडे दहा अकरा वाजता मांडळ येथे पांझरा नदीत छापा टाकला असता समाधान पाटील यांचे नंबर नसलेले ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळून आले मारवड पोलिसात ट्रॅक्टर जमा करण्यात आले.

तर दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास बोरी नदी पात्रात छापा टाकला असता टेम्पोची यात्रा भरलेली आढळून आली. पैकी एम एच 07 आय ए 4835, एम एच 03 ए एच 5644, एम एच02 वाय ए 2008, एम एच 28 एस 7360, एम एच 19 बी एम 009 आणि चार बिना नंबरचे टेम्पो पकडण्यात येऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.