पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४२ पैकी २२ जागांवर आघाडी

0

नवी दिल्ली – ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपानं मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना आव्हान दिलं होतं. देशात सर्वात जास्त हिंसाचार झालेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४२ पैकी २२ जागांवर आघाडी मिळाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 42 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या सुरवातीला तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर, तर भाजपला 19, काँग्रेसला 1, जागेवर आघाडी मिळाली आहे.

‘एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही, कारण अशा रणनीतीचा वापर फक्त ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो’, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून म्हटले होते. यावरून ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, ‘मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.